लोनेश्वर विद्यालयात ध्वजारोहण

लोनेश्वर विद्यालयात ध्वजारोहण

लोणी : उदगीर तालुक्यातील लोणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोणी येथे आज सकाळी ठीक सात वाजून दहा मिनिटांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कल्याणी एस .व्ही यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर शाळेच्या परिसरामध्ये ढोल ,ताशा ,लेझीम , विविध नेत्यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचा संघ, व विविध पथकाच्या साह्याने शाळेच्या परिसरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली .त्यानंतर शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सौ .कल्याणी एस.व्ही. उपस्थित होते .तर प्रमुख पाहुणे महेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शेट्टे एम.जी .व महेश शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रवीण जी बिरादार उपस्थित होते.
शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याविषयी भाषणे केली. त्यानंतर देशभक्तीपर गीत अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर शाळेतील काही शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे श्री प्रवीण जी बिरादार यांनी 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कसा साजरा केला पाहिजे? हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले, तर शेट्टे एम.जी. यांनी 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त कविता गायले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. कल्याणी एस.व्ही. यांनी 75 वे स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त शालेय वेळेमध्ये घेतलेल्या विविध उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितले.व आपला देश कसा स्वातंत्र्य झाला? याविषयीची माहिती सांगून अध्यक्षीय समारोप केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घुगे रेणुका या विद्यार्थिनी केले. तर आभार प्रदर्शन मठपती समृद्धी या विद्यार्थिनी मांडले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी ,पालक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या परिसरामध्ये झाडे लावून विद्यार्थ्यांना केळी वाटप करून औद्योगिक वसाहतीचे चेअरमन श्री गुरडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना जेवण देऊन कार्यक्रमाचा समारोप केला.

About The Author