कृषिदुतांनी आयोजन केले ॲझोला उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रत्यक्षीक

कृषिदुतांनी आयोजन केले ॲझोला उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रत्यक्षीक

उदगीर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथील कृषीदुताने युवकांसाठी प्रेरणा देणारा उपक्रम राबवला. या मध्ये ॲझोला उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रत्यक्षीकाच्या माध्यमातून शेतकरीवर्गाला मार्गदर्शन केले. ॲझोला हे हिरवे जलशैवाळा वनस्पती, या मध्ये २५ ते ३० टक्के पर्यंत प्रथिने आहेत.
पुरक पशुखाद्य म्हणून पशुपालनासाठी हे पीक महत्त्वाचे आहे. दुभत्या जनावरांकडून अपेक्षित दूध उत्पादन मिळवण्यासाठी त्यांना संतुलित आहार देणे गरजेचे आहे.
हिरवा चारा खाऊ घालणे ही दूध उत्पादन खर्च कमी करण्याची आणि उत्पन्न वाढवण्याची गुरूकेिली आहे, यासाठी कमी खर्चात व चारा टंचाईत ॲझोलाचा जनावरांच्या आहारात वापरावा. असे उपस्थित शेतकऱ्यांना आवहान करत प्रत्यक्षीकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम कृषिमहाविद्यालया मार्फत असलेला ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम सन .२०२२- २०२३ ह्या कार्यक्रमाअंतर्गत राबवला जात आहे.यावेळी गावातील शेतकरी, उपस्थित होते. महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.ए.पी.सूर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक ङाॅ. एस. एन. वानोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.एस. नवले यांचे मार्गदर्शनाखाली कृषी दुत लक्ष्मीकांत तौर यांनी हा कार्यक्रम राबवला.

About The Author