डॉ. किरण गोरे यांचा सत्कार

उदगीर प्रतिनिधी : उदगीर शहर ही जन्मभूमी असलेल्या आणि याच जन्मभूमीत बराच कालावधी वैद्यकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या डॉ. किरण गोरे – जाधव यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने लातूर जिल्हा परिषद अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याचा, कर्मचाऱ्यांचा सत्कार, गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जिल्हा परिषद लातूरच्या वतीने उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण गोरे- जाधव यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करून त्यांच्या या कार्याची दखल घेत, प्रशासनाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
हा सन्मान माझा नसून, माझ्या कार्यात सतत सहभागी असलेल्या माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांचा आहे. या शब्दात डॉ. किरण गोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या सत्काराबद्दल उदगीर परिसरातील अधिकारी, कर्मचारी वर्गातून आणि त्यांच्या मित्र परिवारातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

About The Author

error: Content is protected !!