दापका येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन अमृत महोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा

दापका येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन अमृत महोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा

कमालनगर (एल.पी. उगिले) : बिदर जिल्ह्यातील कमलनगर तालुका मधील दापका सर्कल येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ढोल ताशाच्या स्वरूपात गावात रॅली काढण्यात आली. हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हे घोषवाक्य देण्यात आले. रॅली संपल्यानंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी एका रांगेत बसून विद्यार्थ्यांनी भाषणे केली, आणि गावातील ज्येष्ठ नागरिक विलास भाऊराव जाधव गुरुजींनी मनोगत व्यक्त केले.
प्रत्येक शिक्षकांमध्ये सर्जनशीलता असते आणि सुप्त गुण असतात. त्यासाठी त्या शिक्षकांना मुख्याध्यापक व शिक्षक यांचा कर्तव्यदक्ष नातं असावं लागतं, त्यातूनच शालेय व्यवस्थापन व्यवस्थित चालतेय, त्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक मुख्याध्यापकावर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांची जर प्रगती, आलेख, शाळेचा मुख्याध्यापक विविध गुणाने निपून असला पाहिजे. तो सतत शाळेत राहिला पाहिजे. शाळेतील भौतिक सुविधा लक्ष दिले पाहिजे. मुख्याध्यापक आपले कर्त्याव्य बाळगून प्रशासन व्यवस्था चालवावी. असा आदेश गुरूजीनी दिले.
माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश वाडीकर यांनी बोलत असताना स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव वर्ष आणि अमृत महोत्सव वर्ष याबद्दल माहिती दिली. समाजाच्या गरजा सांगितल्या. राष्ट्राचे प्रगती कशावर अवलंबून आहे ते सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सावळे, अर्चनाताई शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष गैवंस शेख प्रमुख अतिथी अंकुश वाडीकर ज्येष्ठ नागरिक, विलासराव गुरुजी, भगवानराव जाधव, गोविंद ताटपल्ले शालेय व्यवस्थापन समिती प्राथमिक, माध्यमिक गावातील नागरिक मुख्याध्यापिका कोंगे सुनंदा, माध्यमिक मुख्याध्यापक भानुदास वासरे व सहशिक्षक शिवाजी शिगरे, संजीव बिरादार, विलास शिवपुरे,चेन्नईबसवा स्वामी, अर्चनाताई राजश्री शिंदे व प्राथमिक शिक्षक मारुती बिरादार, अशोक जाधव, गुणवंत बिरादार, सुवर्णा खंदाडे, अर्चना रेड्डी, अर्चना सुशेटवार, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते.

About The Author