महाराष्ट्र उदयगिरीत एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र उदयगिरीत एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
उदगीर (प्रतिनिधी): येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात "ई कॉमर्स, पीसी इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स" या विषयावर एकदिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते झाले. प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांनी  प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश व आवश्यकतेची माहिती दिली.

रामचंद्र तिरुके यांनी विद्यार्थ्यांना खरेदीदार नव्हे तर उत्पादक व्हा, असा सल्ला दिला. सदरील कार्यशाळेला साधनव्यक्ती म्हणून महेश पत्रिके, विभागीय समन्वयक एम.के.सी.एल. लातूर, सुरेंद्र शिंदे, नेटवर्क इंजिनीयर, एम.के.सी.एल. व प्रा. डॉ.डी.बी.कोनाळे, शिवाजी महाविद्यालय, उदगीर हे उपस्थित होते.
सदरील कार्यशाळेत 204 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यशाळेच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटिया यांनी कौशल्य विकासाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा.डॉ.बी.एस.होकरणे, प्रा.डॉ.एस.एन.घोंगडे, प्रा.डॉ.एस.व्ही.आवाळे, प्रा.राहूल बिरादार,प्रा.एस.एम.सूर्यवंशी सहकारी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु.अश्विनी उमाकांत रोडगे व कु.अमृता विश्वनाथ स्वामी यांनी केले. प्रा.एस.एम.सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About The Author