अक्षरनंदन शाळेमध्ये दहीहंडी संपन्न

अक्षरनंदन शाळेमध्ये दहीहंडी संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : येथील अक्षरनंदन शाळेत कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी व राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मारोती बिरादार उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दंत चिकित्सालय डॉ. पंकजा बिरादार उपस्थित होत्या. त्याचबरोबर सौ. गीता रोडगे ,आनंद हालगरे व प्राथमिक चे मुख्याध्यापक जिवणे शिवशंकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीता तोडकरे यांनी केले तर आभार सौ. सुवर्णा ऐणापुरे यांनी मांडले. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत गीताने व शाल, श्रीफळ पुष्पहारणे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ वर्षाखोंडे यांनी केले. याप्रसंगी शिशुगट व बालगट व वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांची राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वेशभूषेत प्रथम, द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, व बक्षीस समारंभ झाला.

About The Author

error: Content is protected !!