नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लवकरात लवकर लावा – अनिस ची मागणी
उदगीर प्रतिनिधी : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाला आता नऊ वर्ष होत आले आहेत, तरीही अद्याप गुन्हे शोध पथकाला खुनी सापडत नाहीत. ही शोकांतिका आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा द्यावी. अशी मागणी करणारे निवेदन अंधश्रद्धा निर्मूलन समिती उदगीर शाखेच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे यांना दिले आहे. तसेच सदरील निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या पर्यंत पोहोचवावे आणि तपासाला गती द्यावी. अशी ही मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती उदगीरचे अध्यक्ष विश्वनाथ मुडपे, उपाध्यक्ष बाबुराव माशाळकर, प्रधान सचिव शिवाजी गोटमुकले, बालाजी सुवर्णकार, अहमद सरवर, खुर्शीद शेख, व्ही एस कुलकर्णी इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.