लाल किल्ल्यावर फडकणारा ध्वज बनविणाऱ्या कामगार केवळबाई यांच्या हस्ते मातृभूमीत ध्वजारोहण

लाल किल्ल्यावर फडकणारा ध्वज बनविणाऱ्या कामगार केवळबाई यांच्या हस्ते मातृभूमीत ध्वजारोहण

उदगीर : भारतीय स्वातंञ्याच्या अमृत महोत्सव निमित्त लाल किल्ल्यावर फडकणाऱ्या तिरंग्याचा धागा मागील ५० वर्षापासून विणणाऱ्या केवळबाई कांबळे यांच्या शुभहस्ते मातृभूमी महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्बारा संचलित मातृभूमी महाविद्यालय, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल ,मातृभूमी नर्सिंग स्कूल येथे उदगीर येथिल खादी ग्रामोद्योग केंद्रात मागील ५० वर्षापासुन तिरंगा ध्वजाचा धागा विणणार्‍या केवळबाई कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . मातभूमीच्या वतीने केवळबाई कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना केवळबाई कांबळे म्हणाल्या मागील ४९ वर्षापासुन भारतासह जगभर गर्वाने फडकणारा तिंरगा ध्वज बनवण्याचे काम मोठ्या अभिमानाने व आनंदाने मजूरीवर काम करत केले .
जीवनभर अभिमानाने ज्या तिरंगा ध्वजाचा धागा विणन्याचे काम केले . त्या तिरंगा ध्वाजाचे धवजारोहन करण्याचे भाग्य “मातृभूमीने” मला उपलब्ध करुन दिले .आभिमान,गर्व आंनद वाटला.

यावेळी   संस्थेचे सदस्य संजय राठोड  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले  स्वातंञ्य हे फुकट मिळाले नसुन  आनेक विरांनी आपल्या जीवाची  आहुती दिली आहे . मिळालेले स्वतंञ्य     हे  क्रांती सोबतच   महात्मा गांधीजीच्या  अहिंसा तत्वामुळेच मिळाले  . गांधीजींच्या  अहिंसा तत्वाबद्दल   आजही वेगवेगळे विचार प्रवाह आहेत परंतू भारतातील तात्कालीन परीस्थिती पहाता   म गांधी यांचा अहिंंसेचे  तत्वामुळेच  स्वतंञ्य मिळाल्याचे सांगीतले . यावेळी वसंत शिरसे यांनी   स्वातंञ्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना  विद्यार्थ्यांनी  पर्यावरण रक्षण , ऐहित्यासिक  वास्तू  चे संवर्धन ,स्वच्छता , या वेगवेगळ्या उपक्रमातून  सहभागी  व्हावे.

  यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे प्राचार्य उषा कुलकर्णी संजय राठोड,  वसंत शिरसे , सुधीर पाटील किरण  होळसंबरे ,ओमकार कुलकर्णी ,प्रणव चव्हान ,माधव घोणे प्रा. बिभीषण  मद्देवाड,  प्रा उस्ताद सय्यद,प्रा रणजीत मोरे , धोंडीराम जोशी, उषा सताळकर ,रेखा रणक्षेत्रे , नंदकिशोर बयास , पोतदार, रूपाली कुलकर्णी, आदींची उपस्थिती होती.

अमृत महोत्सवा निमित्त मातृभूमीने राबवले विविध उपक्रम

मातृभूमीने स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवा निमित्त तिरंगा रॅली तिरंगा विद्यार्थी साखळी ध्वज प्रदान कार्यक्रम राबवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रवीण बँक शेट्टी यांची उपस्थिती होती यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनीही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर तीर कार्यालयाचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांची उपस्थिती होती मातृभूमीच्या वतीने विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व निबंध लेखन व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मातृभूमीला संस्कृत कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते

About The Author