भाजपच्या वतीने अहमदपूरात अमृत महोत्सवानिमित्त अभुतपुर्व मोटारसायकल रॅली, 75 सैनिकांचा सत्कार
अहमदपुर (गोविंद काळे) : आझादीका अमृतमोहत्सवा निमित्त स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेत्रत्वाखाली अभुतपुर्व असी तिरंगा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील अँड. अमित रेड्डी यांच्या निवासस्थानाच्या भव्य प्रांगणात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सकाळी माजी सैनिक कर्णल हारणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते देशसेवा करुन सेवानिवृत्त झालेल्या 75 सैनिकांचा सत्कार करुन गौरव करण्यात आला. तसेच जिवणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांचाही यथोचित सत्कार करुन गौरव करण्यात आला. अभुतपूर्व अशा मोटारसायकल रॅलीची सुरवात सकाळी रेड्डी पेट्रोल पंप अहमदपुर येथून होऊन छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, हनुमान मंदिर, हिनालॉज, ग्रामीण रुग्णालय, सावरकर चौक, थोडगा रोड, शॉपिंग सेंटर मार्गे पोहचुन वैभव लॉजच्या समोर यशस्वी सांगता झाली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात निघालेल्या तिरंगा मोटारसायकल रॅलीने आजपर्यंतचे अहमदपूर शहरातील रेकार्ड ब्रेक केले असून संपूर्ण शहर तिरंगामय व भारतमातेच्या जयघोषानी नाऊन निघाले होते.
भारतीय जनता पक्षाच्या 1075 कार्यकर्त्यांनी मोटारसायकलवरून तिरंगा रॅली काढली तर रॅलीच्या समोर सजवलेल्या रथात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव केंद्रे हे होते.
सदरील तिरंगा मोटारसायकल रॅली मध्ये देवेंद्र देवणीकर, माजी सभापती आर.डी.शेळके, राजकुमार मजगे, शरद जोशी, श्रीकांत भुतडा, जिवणकुमार मदेवाड, अमित रेड्डी, सुधीर गोरटे, निळकंठ पाटील, बाबुराव बावचकर, राजकुमार खंदाडे, गोविंदराव गिरी, रामभाऊ बेल्लाळे, रामभाऊ नरवटे, देविदास सुरनर, अँड.निखील कासनाळे, राहुल शिवपुजे, ज्ञानोबा बगगिरे, अँड.किशोर कोरे, डॉ. सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, व्यंकट पाटील, इतिराज केंद्रे, चंद्रशेखर डांगे, नागेश भुतडा, धनराज गुट्टे, माणीक नरवटे, चंद्रसेन पाटील, बालाजी गुट्टे, बाळु केंद्रे, विक्रम भोसले, मुन्ना कांबळे, संग्राम नरवटे, गजेंद्र वलसे, रणधीर पाटील, बाळु गुरमे,बाळू आकणगिरे, इंद्रजित मोरे, गोविंद दगडे, विलास पाटील, रोहीदास जाधव, नागनाथ माने, प्रशांत जाभाडे, अमोल इरले, संतोष कदम,राजू कांडणगिरे, संगम कुमदळे, वैभव बलूरे यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने व उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीचे शहरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे ठिक ठिकाणी मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवृष्टी करत तिरंगा मोटारसायकल रॅलीचे स्वागत केले.
