ज्ञानेश्वरी शिंदेने रचला इतिहास…
अहमदपूर (गोविंद काळे) : उत्कृष्ट प्यारी अटॅकचे कौशल्य असलेल्या लातूरच्या ज्ञानेश्वरी शिंदेने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत लंडन येथे झालेल्या राष्ट्रकुल तरवारबाजी स्पर्धेत कनिष्ठ गटात आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत भारताला सांघिक गटात रौप्य पदक मिळवून दिले. संयम व बुद्धी चातुर्य यांचा उपयोग करून इपी या तलवारबाजीच्या क्रीडा प्रकारात तिने हे यश संपादन केले. यापूर्वी सलग तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धा ती खेळली आहे. या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय संघाने अनेक देशाचा पराभव केला. पहिल्या आठ देशाच्या झालेल्या सामन्यात भारताने न्युझीलँडचा 45 – 40 असा पराभव केला . उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाच गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात मात्र यजमान इंग्लंड संघाकडून भारताला 45 – 25 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले ज्ञानेश्वरीला प्रशिक्षक वजीरोद्दीन काझी ,वैभव कज्जेवाड, शेख मोसीन, आकाश बनसोडे, रोहित गलाले, मैफूजखान पठाण, कृष्णा शिंदे, आदित्य ससाणे यांनी प्रशिक्षित केले. या गुणी खेळाडूचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष मा.आ. सतेज बंटी पाटील, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे मार्गदर्शक शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त अशोकजी दुधारे, कार्याध्यक्ष प्रकाश काटोळे, सचिव उदय डोंगरे, कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे, सचिव छत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ता गलाले, मु.अ. काबरा, जाधव एस. आर. व्ही.व्ही. गंपले, प्रशांत माने, ज्ञानोबा भोसले, सुषमा पाटील, शिवालीका हाके पाटील, लष्करी जबीम, आशा रोडगे, जहिंद क्लबचे सर्व सदस्य ,लातूर जिल्हयातील सर्व संघटना व खेळाडूनीं केले.
