बालाघाट एज्युकेशन कॅम्पस च्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

बालाघाट एज्युकेशन कॅम्पस च्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतन तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल, रुद्धा तालुका अहमदपूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी शुभेच्छा देताना श्री हाके यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांमध्ये अधिकाअधिक देशप्रेम निर्माण करावे असे मत मांडले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये मोटरसायकल रॅली, पदयात्रा, वृक्षलागवड, असे कार्यक्रम व रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा घेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

गणेश हाके भाजपाप्रणीत बेस्ट कामगार संघाच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने प्राचार्य स्वप्निल नागरगोजे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री गणेश शिक्षण मंडळाच्या सचिव प्राचार्य रेखाताई हाके, संचालक कुलदीप हाके संचालिका शिवालीकाताई हाके, माजी सरपंच पांडुरंग केंद्रे, नारायण केंद्रे, हेमंत गुट्टे, बबलू पठाण, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्राचार्य स्वप्नील नागरगोजे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मदन आरदवाड, प्राचार्य रूत चक्रनारायण, सर्व प्राध्यापक शिक्षक वृंद व इतर कर्मचारी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!