संत ज्ञानेश्वर विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव प्राचार्या. रेखाताई हाके पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भित्तिपत्रकाचे प्रकाशन वर्ग दहावीचे विद्यार्थ्यांनी आणि प्राचार्य रेखाताई हाके पाटील, मुख्याध्यापक आशाताई रोडगे,मुख्याध्यापक उद्धव शृंगारे व सर्व शिक्षक वृंद यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांनी देशभक्त, स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, यांच्या विषयी माहितीचे प्रदर्शन भरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी हिंदी,मराठी, इंग्रजी या भाषेतून अतिशय सुंदर भाषणे केली. विविध महामानवाच्या, क्रांतिकारकांच्या,नेत्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी आले होते.स्वातंत्र्य दिनाचे जल्लोषात स्वागत करून जयघोष करीत नारे देत, देशभक्तीपर गीत गात, लेझीम पथक घेऊन अहमदपूर नगरीमध्ये विद्यालयाने प्रभात फेरी काढून, विद्यार्थ्यांना खाऊ देऊन, कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सुरेश वट्टमवार, गणपत जाधव, दीपक मुसळे सह शिक्षक-पालक संघ व माता-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. सुत्रसंचालन सतीश साबणे व संगीता आबंदे यांनी केले तर आभार शबाना शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!