स्वराज्य मित्र मंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वराज्य मित्र मंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ 2022 यांची स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ मजगे यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच सर्व मित्र परिवारातील जेष्ठ सदस्याच्या उपस्थित बैठक पार पडली. सर्व प्रथम श्री गणरायाचे वंदन करून नंतर मंडळाची बैठक सुरू झाली. मंडळाचे हे यशस्वी 14 वे वर्ष आसून त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे जी अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक आपण काढतो ती या ही वर्षी काढणे व तसेच सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम घेत हे वर्ष “स्वराज्याचा अमृत महोत्सव” मनून पार पाडण्याचा सर्वांनी मानस केला.व तसेच यावर्षीच्या उत्सवात एक सदस्य एक वृक्ष, रक्तदान शिबिर, व अजून काहीतरी विशेष कार्यक्रम राबवण्यात येईल असे सांगण्यात आले. व नंतर एक मताने श्री संकेत गिरी सर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व पुढील कार्यकारणीची सन 2022 गणेशोत्सवासाठी नियुक्त करण्यात आली.अध्यक्ष: संकेत गिरी, उपाध्यक्ष: धनजंय बोराडे, आशिष होनराव, सचिव: पंकज गंगथडे, सहसचिव: संदेश डवरे, कार्याध्यक्ष: शिवराज जी चोतवे, कोषाध्यक्ष: राहुल जी भालेराव, आरती प्रमुख: ऋषी पामुलावर, जगदीश कावळे, मिरवणूक प्रमुख : सर्व माझी अध्यक्ष. यांची निवड करण्यात आली. व मित्र परिवारातील सर्व श्री: विनायक नागरगोजे, दत्तात्रय गंगथडे, गजानन सोमवंशी, मारुती हेमनर, सुनील सर देशमुख ,राजू जाधव ,नितीन गडवे सर, फयुम शेख, रमेश जाधव, दिपक मजगे, सुरेंद्र गिरी सर, महेश जाधव, विशाल चापटे, देवा उराडे,विशाल राठोड,मुसळे सर जी, नरसिंगअण्णा पामुलावार, स्वप्नील भोसले, सुरेश सोनकांबळे, बाळू होनाळे, राम केंद्रे, अंगदअण्णा बालवाड, बालाजी कानवटे ,सुदर्शन हालसे मनोज देशपांडे, पप्पू कावर, रोहित बारोळे, सलीम सय्यद व समस्त स्वराज्य मित्र परिवार या बैठकीत उपस्थित होते व नंतर नूतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला.
