ज्ञानदीप अकॅडमी येथे अकॅडमी च्या जवानांकडून झेंडा वंदन

ज्ञानदीप अकॅडमी येथे अकॅडमी च्या जवानांकडून झेंडा वंदन

अहमदपूर (गोविंद काळे) : भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमृत महोत्सव ज्ञानदीप अकॅडमी मध्ये विधार्थांनी परेड (ड्रिल ) करुन जल्लोषात साजरा केला. ज्ञानदीप अकॅडमी अहमदपूर चे संचालक मा.श्री.उद्धव इप्पर व अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेऊन भरती झालेले विद्यार्थी नागनाथ इप्पर (ssb) अमोल जायभाये (army) राहुल जायभाये (army) परमेश्वर सुरनर (army) या सर्वांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर राष्टीय गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच अकॅडमी च्या 10 विधार्थिनी NCC करत आहेत त्यांनी पण परेड केला. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच प्रा. राहूल ढवळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री इप्पर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करा ग्राऊंड करा मेहनत घ्या मेहनती ला पर्याय नाही आणि तुम्ही पण पुढच्या वर्षी अंगावर वर्दी घालून अकॅडमीमध्ये झेंडा वंदन करायला या असा मोलाचा संदेश दिला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कावळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप मुसळे यांनी केले. कार्यक्रम साठी नाथराव केंद्रे, बाबा शैख, आदिनाथ मुंढे, नवनाथ इप्पर, मेघराज इप्पर, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. नितीन गुट्टे ,ग्राऊंड प्रशिक्षक राम मेजर ,जितेंद्र मेजर व महिला प्रशिक्षक अर्चना करपे मॅडम व प्रकाश राठोड, संदीप नरवटे, यांनी सहकार्य केले.

About The Author

error: Content is protected !!