यशवंत विद्यालयात ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे ध्वजारोहण संस्था सचिव डी बी लोहारे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर, प्राचार्य व्ही व्ही गंपले, सेवानिवृत्त उप मुख्याध्यापक शिवाजीराव गायकवाड सह मान्यवरांची उपस्थिती होती. या समयी शालेय विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी शपथ व शिस्तीची शपथ डॉक्टर अशोकराव सांगवीकर यांनी दिली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेत भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा घेऊन विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी उपप्राचार्य गिरीधर घोरबांड, उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्वेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, एनसीसी विभाग प्रमुख अशोक पेदेवाड, रामलिंग तत्तापूरे, अरुण मोरे सह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर व्ही पाटील यांनी तर आभार के डी बिराजदार यांनी मांनले.
