सार्वजनिक ध्वजारोहणाचा सोहळा अहमदपूर उत्साहात साजरा

सार्वजनिक ध्वजारोहणाचा सोहळा अहमदपूर उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील जिल्हा परिषदेच्या मैदाना मध्ये सार्वजनिक भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी ध्वजारोहण उपजिल्हाधिकारी श्री प्रवीण पुलारी यांच्या हस्ते फडकविण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री प्रवीण फुलारी म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यासाठीचा सोहळा असल्याचे सांगून तरुणांनी देशावर अपार प्रेम करावे आणि सोबतच जिद्द, चिकाटी, परिश्रम या त्रिसूत्रीच्या जोरावर आपले जीवन घडवावे असे आवाहन या प्रसंगी केले. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, नायब तहसीलदार अजय पाटील, नायब तहसीलदार एस आर मोरे, नायब तहसीलदार एम एस पेदेवाड, नायब तहसीलदार बबीता आळंदे, सपोनी रामचंद्र केदार, सपोनी प्रभाकर आंदोरीकर सह शिक्षणप्रेमी नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तंबाखू विरोधी शपथ सहशिक्षक रामलिंग तत्तापुरे यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!