एक हजार फूट तिरंगाध्वज प्रतिकृतीच्या तिरंगारॅलीने अहमदपूर दुमदुमले
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नगरपरिषद अहमदपूर व सम्राट मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या 1000 फूट लांबीच्या शौर्याचे व त्यागाचे प्रतीक असलेला तिरंगा ध्वज प्रतिकृतीची तिरंगा रॅलीने अहमदपूरकरांचे लक्ष वेधून घेतले या रॅलीने व देशभक्तीच्या जयघोषाने अहमदपूर शहर अक्षरशः दुमदुमले. डोळ्याचे पारणे फिटावेत राष्ट्राच्या प्रति उर भरून यावा असा देखणा अमृत महोत्सवी सोहळा अहमदपूरकरांनी पाहिला.
येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या समोरून या तिरंगा रॅलीस सुरुवात करण्यात आली. रॅलीच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी महाविद्यालयाचे अध्यक्ष अँड. किशनराव बेंडकुळे होते.तर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी मंत्री विनायकरावजी पाटील यांच्या हस्ते फीत कापून या रॅलीचे उद्घाटन करण्यातआले.प्रमुख पाहूणे म्हणून माजी आ.बब्रुवान खंदाडे, प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, जि.प.सदस्य अशोकरावजी केंद्रे, माजी सभापती दिलीपरावजी देशमुख, प्राचार्या डॉ. अनिता शिंदे, अमितभैय्या रेड्डी, लक्ष्मणराव अलगुले, रामभाऊ नरवटे, हनुमंतराव देवकते, उपप्राचार्य पी. बी बाबुळगावकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सुरुवातीला माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते फीत कापून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, हनुमान मंदिर, शहीद गौतम वाघमारे चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सावरकर चौक या मार्गे मार्गस्थ झाली. यावेळी या तिरंगा ध्वजावर अहमदपूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत जागोजागी पुष्प वर्षाव करत या तिरंगा रॅलीचे स्वागत केले. भारत माता की जय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिरायू होवो ,जय हिंद अशा राष्ट्र प्रेरक घोषणेने संपूर्ण अहमदपूर शहर दुमदुमून गेले एकूणच या तिरंगा रॅलीने राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम केले. हा अमृत महोत्सव जन भागीदारी आणि जन आंदोलन’ च्या भावनेने साजरा केला. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त सर्व अहमदपूरकरांनी कधी नव्हे ते मुख्य रस्त्यावरील महाकाय अशा तिरंगा ध्वजाची प्रतिकृती पाहीली. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज येथे सामूहिक राष्ट्रगीत गाऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला. विशेषतः एन.सी.सी, एन.एस.एस तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे युवक युवती सहभागी झाले होते. विविध शाळा शाळांचे विद्यार्थी, शिक्षक प्राध्यापक, नगरपरिषद कर्मचारी, आरोग्य विभाग सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातात भारतीय राष्ट्रपुरुषांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो, हातातील तिरंगा ध्वज हे लक्षवेधक स्वरूपाचे ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष युवकनेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, आकाश सांगवीकर, प्रा.मारोती बुद्रुक पाटील, प्रा.डाॅ बालाजी कारामुंगीकर, विलासराव चापोलीकर, पत्रकार अजय भालेराव, बालाजी मस्के, गणेश मुंडे, प्रदीप कांबळे, शिवाजीराव भालेराव, कैलास सोनकांबळे, प्रकाश लांडगे, भैय्यासाहेब भालेराव, राहुल सूर्यवंशी, प्रभाकर कांबळे, सचिन बानाटे, आकाश सांगवीकर, आकाश पवार, आदित्य भालेराव, राहुल गायकवाड, मुकूंद वाघमारे, रमेश कांबळे, पत्रकार भिमराव कांबळे, संभाजी कांबळे, शरद कांबळे, मतीन शेख, दिलीप भालेराव, शाम यादव आदींनी पुढाकार घेतला.
