ग्राहकांनी सजग राहणे काळाची गरज – अभिजीत औटे

ग्राहकांनी सजग राहणे काळाची गरज - अभिजीत औटे

उदगीर (एल. पी. उगिले) : सद्यस्थितीत ग्राहकांनी अत्यंत सजग राहणे काळाची गरज बनली आहे. ग्राहकांना लुबाडणारे नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कधी वेगवेगळी प्रोलोभने देऊन, तर कधी वेगवेगळ्या ऑनलाइन सुविधांची माहिती सांगून, लिंकला लाईक करा,लिंक ओपन करा.
अशा पद्धतीच्या जाहिराती समाज माध्यमाच्या आधारावर करतात. अनोळखी व्यक्तीने टाकलेल्या किंवा अशा प्रलोभन दाखवणाऱ्या कोणत्याही नवीन लिंकला ग्राहकांनी फसू नये. असे आवाहन ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे नूतन विभागीय अध्यक्ष अभिजीत औटे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते अभिजीत औटे यांना सर्वच क्षेत्रातील दांडगा अनुभव विचारात घेऊन ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीने मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे. असे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी नुकतेच पाठवले आहे. हे शुभेच्छापत्र देताना हर्षदजी गायधनी हेही उपस्थित होते.
अभिजीत औटे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय सचिव दिलीपजी पडोळ, जुबेर भाई शेख, योगेश मांजुलकर, आशाताई पाटील, संजीव अहिरे, मन्सूर भाई मुलानी, रवींद्र उगले, विनीत साळवी, अशोकजी कुंदप, रंजनाताई देशमुख, चंदनजी पाटील, पुरुषोत्तम पगारे, सुदामजी महाजन, के एच वने, अजित मोरे या राज्य कार्यकारणीच्या आणि विभागीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अभिजीत औटे यांची या निवडीच्या संदर्भात भेट घेऊन विचारणा केली असता, त्यांनी ग्राहकांनी सावध राहावे. यासाठी शासन, प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात. मात्र भोळी भाबडी जनता या सूचनांकडे दुर्लक्ष करून, आकर्षक प्रलोभनाला बळी पडून फसतात.
जनतेची फसवणूक टाळावी, या उद्देशाने ग्राहक अभियोग्यता संरक्षण समिती भारत सरकारच्या अधीन राहून कार्य करेल, कारण माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ही संघटना आहे. सामाजिक बांधिलकी समजून आपण कार्य करू. असे आश्वासनही याप्रसंगी अभिजीत औटे यांनी दिले आहे.

About The Author

error: Content is protected !!