सेंद्रीय शेती व निसर्गोपचारा अभावी देशासमोर आरोग्याचे संकट डाॅ.सुरेश गरड
वलांडी (एल.पी.उगीले) : प्रगतदेशासमोर सद्यस्थितीत सेंद्रीय शेती व निसर्गोपचार चिकीत्से अभावी देशासमोर रोगराई आणि आरोग्याचे भस्मासुरासारखे महाकाय संकट ऊभे असून भावी पिढीचे आरोग्य धोक्यात असल्याची माहीती निसर्गोपचार तज्ञ डाॅ. सुरेश गरड यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात वलांडी ग्रामपंचायतने आयोजीत केलेल्या शेद्रीय शेती व निसर्गोपचार चिकीत्सा आरोग्यासाठी वरदान या कार्यशाळेत डाॅ.गरड बोलत होते.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार धर्माजी सोनकवडे, संयोजक तथा सरपंच राणी भंडारे, सेंद्रीय शेती तज्ञ शेतकरी शाम सोनटक्के लोहारकर, ओमकार मसकल्ले महादेववाडीकर, निसर्गोपचार तज्ञ डाॅ.सुरेश गरड, माजी सरपंच राम भंडारे , सदस्य महेश बंग, शिवगंगा बनाळे, सोनाली गायकवाड , कल्याण बनाळे लोहारा येथील पद्माकर मोगले व परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात ऊपस्थीत होता.
वाढत्या आरोग्याच्या समस्या, कमी वयातील होणारे मधूमेह, ह्रदयरोगासारखे जीवघेणे असाध्य आजार, लठ्ठपणा, नागरीकांची श्रम विरहीत दिनचर्या, तर शेतीत पेरणी पासून ते रासणी पर्यंतचा एकूण कामकाजाचा भाग कारणीभूत म्हणता येईल,उत्पन्न वाढावे या आसुरी अपेक्षेने भरमसाठ रासायनिक खतांचा भडीमार,रासायनिक किटक नाशकांचा बेसुमार वापर केला जातो,हे अत्यंत घातक आहे.
निरोगी जीवन जर जगायचे असेल तर त्या साठी शेतकर्यांची जनजागृती आणि सेंद्रिय शेतीचा सल्ला देणे गरजेचे आहे.त्या सोबतच ग्राहकांनी देखील जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात,त्यांच्या शेतमालाची खरेदी करून,सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन द्यावे असेही आवाहन केले.
आज लातूर जिल्ह्यात बोटावर मोजता येतील ईतकेच शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत,त्यांच्याकडून आदर्श घेऊन इतर शेतकर्यांनी देखील सेंद्रिय शेतीसाठी पुढे येणे काळाची गरज आहे.असेही डाॅ.गरड यांनी या प्रसंगी स्पष्ट केले.
