मनसे तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
उदगीर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा १६ वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपुर्ण महाराष्ट्रात महाविद्यालय युनिट शुभारंभ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मनविसे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे , लातूर जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या सूचनेनुसार उदगीर, जळकोट विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हावगीस्वामी महाविद्यालय आणि संभाजी केंद्रे महाविद्यालय जळकोट येथील मनविसे युनिटचे उद्घाटन मनविसे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण यांच्या शुभ हस्ते व मनविसे शहराध्यक्ष बालाजी कांबळे मनविसे तालुकाध्यक्ष मनसे जळकोट तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिवशेट्टे मनसे उदगीर तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे मनविसे लातूर माजी तालुकाध्यक्ष योगेश सुर्यवंशी मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष महेश देशमुख, मनसे शेतकरी सेना उदगीर तालुकाध्यक्ष बापुराव जाधव,मनविसे तालुकाध्यक्ष रामदास तेलंगे मनविसे उदगीर शहराध्यक्ष दिनेश पवार मनविसे जळकोट तालुकाध्यक्ष शुभम चंदनशिवे,गुरूदत्त घोणसे,शरद चिखले,दत्ता कारलेवाड,विष्णु अंधारे,उमेश तेलंगे,लखन पुरी,अमोल गाजरे,अंकुश नागपुर्णे,गजानन पदमपल्ले,ऋषीकेश भोंग,तसेच इतर अनेक महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषपुर्ण वातावरणात संपन्न झाले.
