स्वातंत्र्यासाठी गांधीजींचे व स्वातंत्र्यानंतर सैनिकांचे योगदान महत्वाचे – रंगा राचुरे

स्वातंत्र्यासाठी गांधीजींचे व स्वातंत्र्यानंतर सैनिकांचे योगदान महत्वाचे - रंगा राचुरे

उदगीर : महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या शिवाय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहास लिहीला जाऊ शकत नाही. गांधीजींमुळेच स्वातंत्र्य लढ्याला एक व्यापक असे राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले होते. स्वातंत्र्यासाठी गांधीजीचे व स्वातंत्र्यानंतर सैनिकांचे योगदान महत्त्वाचे असे उद्गार समाजसेवक रंगा राचुरे यांनी काढले .
ते शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त आयोजित स्वराज्य महोत्सवाच्या समारोप प्रसंगी विशेष व्याख्यान व राष्ट्रवीर सैनिकाच्या सन्मान सोहळ्यामध्ये ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर समाजसेवक रमेश आंबरखाने, नामदेवराव चामले,प्राचार्य विनायकराव जाधव, राजकुमार बिराजदार, विजयकुमार पाटील, उप-प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे,डॉ. एस. व्ही. जगताप इत्यादी उपस्थित होते. पुढे बोलताना राचुरे म्हणाले, अनेक स्त्रिया या लढयांमध्ये गांधीजींमुळेच सहभागी झाल्या होत्या. तसेच हा लढा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने जिंकला. त्यामुळे जगतिल कुठल्याही स्वातंत्र्यलढ्यापेक्षा हा लढा वैशिष्ट्यपूर्ण आहे. गांधीजींमुळेच या लढयाला एका देशव्यापी जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे गांधीजी हे भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार होते. तर स्वातंत्र्यानंतर ही लोकशाही व भारताचे सार्वभौमत्व टिकविण्यामध्ये भारतीय सैनिकांचे खूप महत्वाचे योगदान आहे. असेही समाजसेवक रंगा राचुरे म्हणाले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी अध्यक्षांच्या वतीने डॉ.रामकिशन मांजरे यांनी स्वातंत्र्य लढयावर प्रकाश टाकला. रमेश अंबरखाने यांनी वृक्षारोपणाचे महत्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना आवहान केले. या प्रसंगी बामणीचे सरपंच राजकुमार बिराजदार, मेजर हणमंत भंडे, विश्वनाथ पाटील, राजाराम जाधव ,गुंडप्पा कुंभार,अशोक कोयले,सचिन जाधव, बालाजी बिरादार, उमाकांत पोलकर ,वसंत बिरादार, कामाजी ढवळे इत्यादींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉ. सुरेश शिंदे यांनी सूत्रसंचालन प्रा बालाजी सूर्यवंशी यांनी तर आभार डॉ किरण गुट्टे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!