दि. लिं.होळीकर प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

दि. लिं.होळीकर प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

उदगीर : दहावी व बारावीच्या परिक्षेत त्या त्या शाळा, महाविद्यालयातून सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे, त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे याचबरोबर अभ्यासात मागे असणाऱ्यांनाही पुढे जाण्याची उत्सुकता निर्माण करणे, या उद्देशाने स्वर्गीय दि.लिं. होळीकर यांच्या स्मरणार्थ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रत्येक शाळा महाविद्यालयातून दहावी आणि बारावी वर्गात सर्वश्रेष्ठ गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात येतो. यावर्षी दहावीच्या एकूण 32 विद्यार्थ्यांचा यात 22 मुली आणि 10 मुले तर बारावीच्या 17 विद्यार्थ्यांचा यात 11 मुली आणि 6 मुले या सर्वांचाच मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, एक ग्रंथ भेट देऊन शाल व हार घालून सत्कार करण्यात आला.
येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीरचे उपविभागीय जिल्हाधिकारी अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश सुळे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ जाधव आदींच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी म्हणाले की, उदगीर हे शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची पंढरी असून या उदगीरला एक गौरवशाली इतिहास आहे. या ठिकाणच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम करावेत.
गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी काय काय केलं पाहिजे त्यासाठी कशाकशाची आवश्यकता आहे? हे सांगतानाच महाविद्यालयीन जीवनाच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावं, तशी तयारी करावी. म्हणजे पुढे त्यांना खूप काही मिळू शकतं.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे सूत्र सांगून त्यांना त्यातून मिळणाऱ्या प्रतिष्ठेचा वापर समाज व देशासाठी करण्याचा सल्ला दिला. यशवंत बिरादार यांनी संचालन केले. प्रास्ताविक दत्तारी होनराव यांनी मांडले तर आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!