सुंदर बामणी हरित बामणी उपक्रमाचे सहकार महर्षी चंद्रकांतअण्णा वैजापूरे यांच्या हस्ते भूमिपूजन
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे बामणी येथील उपक्रमशील सरपंच यांनी आपले गाव अर्थात बामणी सुंदर बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून “सुंदर बामणी, हरित बामणी” या उपक्रमाचे भूमिपूजन सहकार महर्षी चंद्रकांतअण्णा वैजापूरे यांच्या हस्ते भूमिपूजन करून वृक्षारोपण लावून केले.
आपल्या गावाचा विकास ही संकल्पना सरपंच राजकुमार बिराजदार यांनी घेतली असून तसा “ड्रीम प्रोजेक्ट” त्यांनी राबवायचे ठरवले आहे. या उपक्रमाच्या प्रसंगी ग्रामसेवक संजय गुरमे, वनाधिकारी मुंडे, कासले यांच्यासोबतच चंदरअण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील हेही उपस्थित होते .
यावेळी बामणी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, दादाराव इंचुरे यांनीही या “ड्रीम प्रोजेक्ट”चे कौतुक केले. तसेच गावातील पाणीपुरवठा सभापती शिवदास गंगापुरे, ग्राम रोजगार सेवक श्रीहरी कवठाळे, बालाजी म्हेत्रे, मुरली महाराज लासूने, माधव बिराजदार, श्रावण कांबळे, लिंबाजी कांबळे, रामचंद्र कांबळे, विशाल कांबळे, यशवंत कांबळे व बाळासाहेब बिराजदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बामणी गाव हे उदगीर तालुक्यातच नव्हे तर मराठवाड्यात आदर्श आणि सुंदर गाव बनावे. या दृष्टीने सर्वतोपरी आपण प्रयत्न करणार असल्याचे राजकुमार बिराजदार यांनी स्पष्ट केले आहे.
