अनिस तर्फे डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन
उदगीर (प्रतिनिधी) : डॉ.नरेंद्र दाभोलकर पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र अनिस शाखा उदगीर तर्फे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयात अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपाध्यक्ष बाबुराव माशाळकर यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी शाळेचे मु. अ.ज्ञानोबा कुंडगिरे,बारा बलुतेदार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर दापकेकर,महिला कार्यकर्त्या वर्षाताई पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात अनिस उदगीरचे अध्यक्ष विश्वनाथ मुडपे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांत रुजविण्यासाठी चमत्काराचे विविध प्रयोग विद्यार्थ्यासमोर सादर केले .तसेच त्यांनी चळवळीतील विविध गीते सादर केली.अध्यक्षीय समारोप करताना बाबुराव माशाळकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन,अंधश्रद्धा,अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याविषयी माहिती दिली.
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होण्यासाठी त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रोहित बिराजदार यांनी केले. तर प्रशांत पांचाळ यांनी आभार प्रदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रफुल्लता बोडके,शशिकांत पाटील,रवी झांबरे यांनी परिश्रम घेतले.
