मंथन पब्लीक स्कूलमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा

मंथन पब्लीक स्कूलमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : येथील मंथन पब्लीक स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संचालक श्री.सोमनाथ अंकुशे हे होते. तर यावेळी प्राचार्या सुवर्णा पाटील यांची मंचावर उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सोमनाथ अंकुशे यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्या सुवर्णा पाटील, शिक्षिका नेहा दुबे यांनी उपस्थित बालकांना दहीहंडी उत्सवाची सविस्तर माहिती दिली.त्यानंतर शाळेतील बालकामधून दहीहंडी फोडण्यासाठी चिठी काढण्यात आली, आणि त्यातून अभिषेक खडके या बालकास दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला.त्यानुसार अभिषेक खडके यांचे हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. शाळेतील बालकांनी राधा-कृष्ण च्या वेशात गोविंदा गीत सादर करीत दहीहंडी फोडली.सामूहिक नृत्याचा कार्यक्रमही यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नेहा दुबे यांनी केले, तर आसमा सय्यद यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका गडमे आर.के., अंकुशे एस.एन., प्रणिता शेळके, सुनीता गौड, सेविका भाग्यश्री मावशी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!