जगण्याचा आनंद घ्यायला शिका – संतोष राम
उदगीर (प्रतिनीधी) : जिवन जगत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते,संघर्ष करावा लागतो. त्यामुळे आपण खचून जायचे का? त्या उदभवलेल्या समस्येवर मार्ग शोधत जिवन जगायचे असते.यश सर्वांसाठी सारखं असु शकत नाही, कोणासाठी पैसा,कोणासाठी प्रतिष्ठा पण माझ्यासारख्यांसाठी मानसिक समाधान महत्वाच आहे.असे चित्रपट दिग्दर्शक संतोष राम म्हणाले.
ते उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर येथे चष्मे वाटप कार्यक्रमात बोलत होते.रूग्णालयाच्या वतिने उपस्थित मान्यवरांचा सत्कार डाॅ.रामप्रसाद लखोटीया अध्यक्ष उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय यांच्या हस्ते करण्यात आला.पुढे बोलतांना त्यांनी स्पष्ट केले की, आज विज्ञानाने खुप प्रगती केली आहे आणि आपण मेहनत करून आपल्या कोणत्याही स्वपनांना पुर्ण करू शकतो.
डाॅ. रामप्रसाद लखोटिया यांनी निर्माण केलेले अरूणा अभय ओस्वाल रिसोर्स सेंटर फाॅर ब्लाइंड स्कूल ही पहाण्याची संधी मला मिळाली, ही संस्था महाराष्ट्रातील एकमेव संस्था असेल, की कोणत्याही शासनाच्या मदती शिवायी तब्बल चाळीस विद्यार्थी यांचे शिक्षण, रहाणे, जेवण अगदी मोफत होते. येथील अंध विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करतात. कॅम्पुटर चालवतात! खरच ही संस्था पाहून मी भाऊक झालो. अंध मुलांची जगण्याची जिद्द आणि त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी डाॅ.रामप्रसाद लखोटिया यांची तळमळ पाहुन अत्यंत प्रेरणा मिळाली.असे ही ते विद्यार्थाना संबोधन करतांना सांगत होते.यावेळी रूग्णालयाचे पि.आर.ओ.गणेश मुंडे,प्रा.राजेंद्र चव्हाण,प्रा मुक्कावर,
राजकुमार भोसले,दिपक निकम व अंध विद्यार्थ्यी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अभार विष्णू पवार यांनी मानले.
