लालबहादुर शास्त्री मा.विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी

लालबहादुर शास्त्री मा.विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी

उदगीर (प्रतिनिधी) : येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात कलोपासक मंडळातंर्गत गोकुळाष्टमीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरूवात श्रीकृष्णाच्या प्रतिमापूजनाने व श्रीकृष्ण जन्माच्या पाळणा गायनाने करण्यात आली.याप्रसंगी प्रमुख वक्ते पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले यांनी ‘ श्रीकृष्ण म्हणजे सर्व जाती, धर्माच्या एकतेचे प्रतिक तर गोपाळकाला एकात्मतेचे दर्शक आहे’,असे प्रतिपादन करत श्रीकृष्णच्या बाल लीलांचे कथात्मक वर्णन केले.श्रीकष्णाच्या लीलेवर आधारीत गोविंदा आला रे,कृष्ण जन्मला ग सखे, मच गया शोर सारी नगरीमें इ.गीतावर मुलींने सुंदर नृत्य सादरीकरण केले.नृत्य सादरीकरणासाठी सुप्रिया बुधे , सुरेखा शिंदे व विजया गोविंदवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
या नंतर मनोरे तयार करण्यासाठी संतोष कोले ,संदीप जाधव ,आशा कल्पे व अनिता मूळखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.ऋतूजा पांचाळ या विद्यार्थ्यीनींने सुंदर गीत गायले.
याप्रसंगी संकुलाचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार ,मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर, माधव मठवाले अभ्यासपूरक मंडळप्रमुख बालाजी पडलवार ,विनायक इंगळे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कार्यक्रम प्रमुख प्रिती शेंडे व श्रिया महामुनी यांनी केले तर आभार गुरूदत्त महामुनी यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!