शिवाजी महाविद्यालयात सद्भावना दिवस साजरा
उदगीर : शिवाजी महाविद्यालयात जयंती समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. उपप्राचार्य डॉ. आर एम मांजरे यांनी प्रतिमेचे पूजन केले, सद्भावना दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर कार्यक्रमाधिकारी प्रा बालाजी सूर्यवंशी यांनी सर्वांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमाचे नियोजन जयंती प्रमुख डॉ. सी जे देशमुख व मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉ सुरेश शिंदे यांनी केले . या जयंतीला महाविद्यालयातील स्टाफ सेक्रेटरी डॉ.व्ही डी गायकवाड, प्रबंधक बालाजी पाटील , गुरनाळे व्ही डी ,लाडके आर एम, कदम पांडुरंग, शिवदासे ,भीम पाटील, सौ केंद्रे व विद्यार्थी उपस्थित होते.
