मनसे उदगीर तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या

मनसे उदगीर तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या

उदगीर (एल.पी. उगिले) : आगामी जि प, प स निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सक्रिय कार्यकर्त्यांना तालुका स्तरावरील पदे देऊन पक्ष संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याकडे उदगीर मनसेने पावले उचलली आहेत. कामात सक्रिय सहभाग घेऊन राज साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याची धडपड असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात आहे.
त्याच अनुषंगाने महाराष्ट्र निर्माण रोजगार, स्वयंरोजगार सेनेच्या उदगीर तालुकाध्यक्षपदी राम कांबळे यांची व पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी दयानंद डोंगरे यांची निवड करण्यात आली. ही निवड राज ठाकरे यांच्या आदेशाने प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आली. याप्रसंगी उदगीर तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे , जळकोट तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिवशेट्टे, रामदास पाटील, अभय सूर्यवंशी , जब्बार तांबोळी, सतीश चव्हाण, संतोष भोपळे, रणजीत भंडे , योगेश चिद्रेवार, लखन पुरी , बालाजी पवार, उमेश गायकवाड, ,अमोल गाजरे , चंद्रकांत गठडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!