मारुती महाराज साखर कारखान्यात भविष्यात डीस्टलरी को जनरेशन प्रकल्प उभा राहील – माजी मंत्री दिलीपराव देशमुख
मारुती महाराज साखर कारखान्याचे मील रोलर पूजन संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : मांजरा साखर हा मोठा परिवार असून शेतकरी हा केंद्रबिंदू समोर ठेवून पारदर्शकता आणत परिवाराने जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने काम करीत असून जितकं जास्त शेतकऱ्यांच्या मदत करता येईल ते करण्याचें काम परिवाराने केले आहे कारखान्यात आम्ही कधी राजकारण केले नाही सकारात्मक विचार करत आमची पावले पुढे टाकण्याचे काम सुरु असून सात वर्षांपासून बंद असलेल्या मारूती महाराज साखर कारखान्याने काटकसर करून गतवर्षी चांगले गाळप करून लोकांना न्याय देण्याचे काम परिवाराने केले आहे भविष्यात या कारखान्यात डिस्टलरी को जनरेशन प्रकल्प उभा करणार असल्याचे माजी मंत्री मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब यांनी यावेळी बोलताना सांगितले ते शनीवारी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत श्री शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या चालु गाळप हंगानाच्या २०२२- २३ च्या मील रोलर पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष अॅड श्रीपतराव काकडे, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, संत मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपती बाजुळगे, उपाध्यक्ष श्याम भोसले, रेणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जागृती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, रेणा सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष अंनत देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, अनुप शेळके, जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, उदयसिंह देशमुख उपस्थित होते.
उस सर्व गाळप करून एफआरपी सहीत रक्कम अदा केली
यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की मारुती महाराज साखर कारखाना सुरु करण्यासाठी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली तसेच जिल्हा बँकेने वेळेवर मदत केल्याने हा कारखाना सुरु झाला असे सांगून कारखान्याची गाळप क्षमता वाढवणार असून त्यासाठी कारखाना प्रशासन यांच्याकडून पाठपुरावा सुरु आहे असे सांगून मांजरा साखर परिवाराने जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता सर्वांचे उस गाळप झाले त्यानंतरच कारखाने बंद केले जिल्ह्यांतील मांजरा साखर परिवाराने तब्बल ५८ लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून तब्बल १५०० कोटी रुपये एफआरपी सहीत उस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे काम तेही वेळेत पूर्ण केले जो शब्द दिला होता तो तंतोतंत पाळून लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही असे सांगून उसाचे गाळप कसे होईल असं लोक म्हणायचे पण दिवस रात्र करून लोकां चा दिलेला शब्द पाळला उसाचे कुणाचे टिपरू शिल्लक ठेवला नाही.
यावेळी मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अँड श्रीपतराव काकडे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुलगे, शेतकरी संघटनेचे राजेन्द्र मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास औसा बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील, माजी संचालक संभाजी सुळ, सचिन दाताळ, हरिराम कुलकर्णी, अँड बाबासाहेब गायकवाड, चां दपाशा इनामदार, सतिष पाटील, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, बेलकुंड चे सरपंच विष्णू कोळी मांजरा साखर कारखान्याचे संचालक महेंद्र भादेकर, प्रवीण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक विलास शिंदे अनिल झिर्मिरे हरीचंद्र यादव, शामराव पाटील, सचिन पाटील, सुरेश पवार हणमंत माळी गितेश शिंदे, प्रदीप चव्हाण, प्रवीण कोपरकर, प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे यांनी केले सूत्र संचालन सचिन पाटील यांनी तर आभारप्रदर्शन कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले यांनी मांडले.
