शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला तात्काळ देण्याचे कृषीमंत्री मा.अब्दुलजी सत्तार यांचे आमदार बाबासाहेब पाटील यांना आश्वासन !
अहमदपूर (गोविंद काळे) : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री मा.अब्दुलजी सत्तार लातूर जिल्ह्यात आले होते. यावेळी शिरूर ताजबंद येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव यांच्यासमवेत आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून त्यांचे लातूरकरांच्या वतीने स्वागत केले.
लातूर जिल्ह्याला बसलेल्या अतिवृष्टीचा फटका आणि गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांची व्यथा आणि खरी परिस्थिती अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्यासमोर मांडली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ अधिकाऱ्यांना शेतीपीकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत करण्याचे आदेश दिले.
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीणजी फुलारी, तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी, तहसीलदार शिवानंद बिडवे, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, मंचकराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव वाघ, सभापती शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, जि.प सदस्य निवृत्तीराव कांबळे, शिवाजीराव खांडेकर, इमरोज पटवेकर, अविनाश देशमुख, वसंतराव शेटकार, अभय मिरकले, चेअरमन तुळशीराम भोसले, शिवदर्शन स्वामी, संदीप शेटे, दयानंद पाटील, विष्णुकांत तिकटे, बालाजी गुंडरे, कोंडीबा पडोळे, बबन बिलापट्टे, माधव सरवदे, मक्का स्वामी, सुमित भैय्या वाघ, सतीश नवटक्के, गंगाधर ताडमे, देवानंद जाधव, बाळासाहेब बेडदे, संग्राम गायकवाड, सचिन पडीले, युवराज घोगरे, फेरोज शेख, अफरोज शेख, शेखर जाधव, आबा जाधव, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.
