29 ऑगस्ट रोजी दलित मुस्लिम महामेळावा – निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे)

29 ऑगस्ट रोजी दलित मुस्लिम महामेळावा - निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे)

उदगीर ( एल. पी. उगिले) : देशभरात सध्या दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांक, अपेक्षित, शोषित यांचे शोषण मोठ्या प्रमाणात चालू असून याच्या विरोधात आवाज उठवणे काळाची गरज आहे.याचे निमित्य साधून दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी उदगीर येथे एम आय एम च्या वतीने समविचारी पक्षासह दलित, मुस्लिम महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,शेर ए हिंदुस्थान हजरत टिपू सुलतान, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची जाण ठेवून राजकारण करणाऱ्या समाजकारणी लोकांचा महामेळावा महात्मा फुले चौक, मुसा नगर उदगीर येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती या मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष तथा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष, माजी नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी दिली आहे.
या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून एमआयएमचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी सय्यद मोईन भाई, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एम आय एम चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष फिरोज लाला साहब, हे राहणार असून विशेष अतिथी म्हणून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲड. मोहम्मद अली साहब हे राहणार आहेत.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक फकीर हाश्मी साहब, माजी नगरसेवक नजीर हाश्मी साहब, एम आय एम चे प्रवक्ते अजीज पटेल साहब, स्वराज्य क्रांती लातूरचे संपादक चंद्रकांत जाधव साहब, ज्येष्ठविधीज्ञ तथा राष्ट्रीय दलित अधिकार मंचाच्या सल्लागार रुक्मिणीताई सोनकांबळे या राहणार आहेत.
या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या सक्रिय समाजसेवा करणाऱ्या लोकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने सत्कार करण्यात येणार आहे.
या सत्कार मूर्तीमध्ये मौलाना नौमान खास्मी साहब, जमातेए हिंद महाराष्ट्र केसरी मौलाना नौशाद खास्मी साहब, समदाणी बानीकर साहब, हाफिज ताहेर अत्तार साहब, हाफिज नबीसाब बागवान, हाफिज शेख नजीर साहब, हाफिज सद्दाम भाई ,असद जमाल सिद्दिकी, गोरखंन ट्रस्ट उदगीर चे शेख जहीर भाई, अजहर बानीकर साहब, शेख हक्कानी हुसेन साहब, बहुद्दिन जलकोटे साहब हे राहणार आहेत.

या कार्यक्रमाची नियोजन समिती म्हणून एमआयएमचे शहर उपाध्यक्ष जलील चौधरी, कार्याध्यक्ष मुसा पठाण, मीडिया प्रमुख महबूब मुल्ला, अयाज जहागीरदार, शेख सोहेल, शेख सलमान, सय्यद मोहसीन,शेख सोहेल, शेख सलमान,सय्यद वसीम, सोफी मोहम्मद साहब (मदारी) यांनी केले असून याप्रसंगी ज्येष्ठ नेते शेख बाबन भाई, शेख चांदसाब चिखलीकर, अहमद खान पठाण हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती निमंत्रक माजी नगरसेवक साबिर पटेल आणि संयोजन समितीचे प्रमुख तथा एमआयएमचे उदगीर तालुका अध्यक्ष मुक्रमसाब जागीरदार यांनी दिली आहे.

सदरील मेळावा 29 ऑगस्ट 2022 रोजी सोमवारी मुसा नगर, महात्मा फुले चौक उदगीर येथे सायंकाळी साडेसहा वाजता संपन्न होणार असून या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन एम आय एम चे उदगीर शहराध्यक्ष शेख अखिलमियाॅ शब्बीर मियाॅ यांनी केले आहे.

येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन हा महामेळावा निश्चितच अत्यंत महत्त्वाचा असून या मेळाव्यात केंद्र शासनाच्या अनेक धोरणाचा निषेध करून, पुढील राजकारण ठरवले जाण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या लातूर जिल्हा अध्यक्ष सुस्मिता माने आणि प्रसिद्धीप्रमुख बंटी घोरपडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!