सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल दहीहंडी उत्साहात साजरी

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल दहीहंडी उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे आज गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी चा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी कृष्णाच्या भूमिकेत तर विद्यार्थिनी राधेच्या भूमिकेत आले होते. दहीहंडी छान सजवली होती वातावरण अगदी उत्साही व भक्तीमय झाले होते असा दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी शिक्षण शिंदे सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी साजरा करण्यासाठी संस्थेचे संचालक कुलदीप हाके, संचालिका शिवालिका हाके, प्राचार्य रूत चक्रनारायण, सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!