अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात ‘वॉटर बेल’ चा अभिनव उपक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : महाविद्यालयीन मुला-मुलींचे आरोग्य चांगले व निरोगी राहवे म्हणून व त्यांच्यातील ‘युरिनरी टॅंक इन्फेक्शनच’ वाढते प्रमाण लक्षात घेऊन अहमदपूर महात्मा फुले महाविद्यालयात ‘वॉटर बेल’ म्हणजेच ‘पाणी पिण्याची सूचना’ हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून गत पाच वर्षांपासून आजपर्यंत नियमितपणे राबविला जात आहे.
शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीतच आपला स्वतंत्र ठसा उमटविणा-या येथील महात्मा फुले महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांसाठी नेहमी शैक्षणिक हिताबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. पैकीच हा एक आहे. विद्यार्थी हिताचा हा उपक्रम १जुलै२०१७ पासून राबविण्यात येतो आहे. या उपक्रमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठीची काळजी घेतली जात आहे. महाविद्यालयीन मुला-मुलींच्या शरीरात पाण्याची कमतरता ( डिहाड्रेशन ) हे अनेक आजाराचे प्रमुख कारण असते.त्यांच्या वाढत्या वयाबरोबर शरीराला आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्याने महाविद्यालयीन मुला मुलींमध्ये अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. मुले, त्यातल्या त्यात मुली अभ्यासाच्या नादात दिवसभरात पाणी कमी पितात.
शिवाय कमी पाणी पिण्याची अनेक कारणे आहेत. पाणी वेळेत न पिल्याने झालेले आजार नंतर खूप उशीराने लक्षात येतात. हे महाविद्यालयाच्या प्रशासनाला निदर्शनास आल्यामुळे म्हणून त्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी महाविद्यालयात घंटा वाजविण्याचा १ जुलै२०१७ पासून नियमितपणे महाविद्यालयीन वेळेत तीन वेळा अनुक्रमे पहिली घंटा ११.३० वाजता, दुसरी १ वाजता वाजता आणि तिसरी घंटा दुपारी २.३०वाजता दिली जाते आहे.
हा वॉटर ब्रेक १५ते२० मिनिंटाचा असतो. यात विद्यार्थी तहान असेल तेवढे पाणी पितात. विशेष म्हणजे महाविद्यालया कडून विद्यार्थी व प्राध्यापकांनाही महाविद्यालयात दोन ठिकाणी आर. ओ. चे शुद्ध व आरोग्य परिपूर्ण पाण्याचे योग्य असे पी.एच. लेव्हल असलेले पाणी पिण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
चौकट
शिक्षणातून निरोगी आरोग्याकडे….!
महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या स्वस्थ व चांगल्या आरोग्यासाठी ‘वॉटर बेल’ ही संकल्पना राबविण्याची काळाची गरज आहे. महाविद्यालयात विद्यार्थी व प्राध्यापकांचे आरोग्य चांगले असेल तर शैक्षणिक प्रक्रिया आनंददायी,निकोप बणून ती निरोगी आरोग्यकडे वाटचाल केली पाहिजे. शिवाय विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू असल्याने महाविद्यालयाने ही मोहीम सुरू केली आहे.
- प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर
चौकट
विद्यार्थ्यांचे निरोगी आरोग्य हा केंद्रबिंदू मानून व त्यांनी आरोग्यासाठी वेळेवर पाणी पिणे आवश्यक आहे, हे नॅक कॉर्डिनेटर या नात्याने लक्षात आले.त्यातूनच “वॉटरबेल” चा हा उपक्रम हाती घेण्यात आला.हा अभिनव उपक्रम विद्यार्थी व महाविद्यालयाच्या निरोगी आरोग्याच्या हितासाठीचा आहे. - उपप्राचार्य,डॉ. डी.डी. चौधरी तथा नॅक कॉर्डिनेटर चौकट “केल्याने होत आहेरे आधी केले ची पाहिजे” या भमिकेतून व विद्यार्थी आरोग्य केंद्रबिंदू मानून, विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व आपल्या आरोग्यहीतासाठी दिवसातून काही ठराविक वेळी वेळात वेळ काढून पाणी पिणे आवश्यक आहे, ही बाब ग्रंथपाल या नात्याने माझ्या लक्षात आली. अन् “वॉटरबेल” उपक्रम सुरू झाला. हा “वॉटरबेल” उपक्रम विद्यार्थ्यांना हितकारक आहे, असे मला वाटते.
- ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे
