माळेवाडीच्या चेअरमन पदी बिरादार तर व्हाईस चेअरमन पदी दाडगे

माळेवाडीच्या चेअरमन पदी बिरादार तर व्हाईस चेअरमन पदी दाडगे

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील माळेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी विधिज्ञ चिंतामणी बिरादार तर व्हाईट चेअरमन पदी उमाकांत दाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पॅनल प्रमुख दिगंबर बिरादार तसेच उपसरपंच रमेश मदनुरे यांच्या पॅनलचे माळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सर्व सदस्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडून आले होते. सर्व नूतन सदस्यांनी मिळून एकमताने चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ची बिनविरोध निवड केली आहे.
या सोसायटीवर बिनविरोध निवडून आलेले आहेत.या मध्ये संचालक राजेश्वर प्रभूआप्पा निटुरे, दिगंबर यशवंतराव बिरादार, चिंतामणी रामराव बिरादार, उमाकांत नागशेट्टी दाडगे, शिवराज संग्राम धरणे, अरविंद काशिनाथ कडोळे, प्रकाश विश्वनाथ बिरादार, बलभीम सूर्यकांत बिरादार, शांताबाई सोमनाथ बिरादार, कमळाबाई गुरुनाथ बिरादार, रंजनाबाई शांतलिंग स्वामी, श्रीमंत बळीराम शिंदे, प्रभू धोंडीबा कांबळे या सर्व सदस्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.चेरमन, व्हॉईस चेरमन यांची बिन विरोध निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!