महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बारावी कला ,वाणिज्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात करिअरचा भाग म्हणून सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुती शामसुंदर सारडा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा.जे.आर. कांदे होते .मंचावर प्रा. प्रसाद जालनापुरकर ,प्रा. संदीप मजगे, प्रा. प्रवीण जाहुरे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सारडा म्हणाल्या बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सीए फाउंडेशन ही परीक्षा देता येते. सीए केल्यानंतर शासकीय ,निमशासकीय नोकरीची संधी आणि स्वयंरोजगार निर्माण होऊ शकतो .सीए मध्ये फाउंडेशन, इंटरमिडीएट, फायनल या परीक्षा द्याव्या लागतात .या परीक्षेसाठी लागणाऱ्या अभ्यास पद्धतीची त्यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी श्रुती सारडा यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!