मौजे लोहारा येथील गौयबीसाब बेटाकडे जाणारा रस्ता अतिक्रमण मुक्त
उदगीर : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता सर्व शेतकरी यांच्या उपस्थितीमध्ये उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी त्यांच्या प्रयत्नातून सर्वांना विश्वासात घेऊन गेल्या वीस वर्षापासून जटिल बनलेला प्रश्न मार्गी लावून हा रस्ता अतिक्रमणमुक्त केला.
यावेळी हेर विभागाचे मंडळ अधिकारी पंडित जाधव, तलाठी राजकुमार हालकुडे, पोलीस पाटील दिलीप पाटील ,लोहाराची माजी सरपंच रमाकांत मोमले, माजी उपसरपंच दयानंद सोनटक्के, उद्धव अण्णा रक्षाळे, बालाजी पटणे, पंडित पटणे, लक्ष्मण पटणे, गोविंद सोनटक्के, माजी सरपंच रामेश्वर सोनटक्के, प्रगतिशील शेतकरी श्याम सोनटक्के, बारी पठाण, राम बिरादार, रमाकांत सोनटक्के ,तंटामुक्तीचे अध्यक्ष त्र्यंबक बिरादार, संदीप सोनटक्के, अण्णाराव सोनटक्के गुरुनाथ हेरकर गुरुजी तसेच परिसरातील सर्व शेतकरी लोहारा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
