सौराष्ट्र निधी बँक सहकार क्षेत्रात नवा अध्याय निर्माण करेल – नवनाथ गायकवाड
उदगीर (एल. पी. उगीले) : सौराष्ट्र अर्बन निधी लिमिटेड ही बँक युवकांनी उभा केली असल्यामुळे आणि त्यांच्या पाठीमागे सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे यांच्यासारख्या हजारोंचा आधारवड असलेल्या कर्तबगार नेत्याचा आशीर्वाद असल्याने सौराष्ट्र निधी बँक सहकार क्षेत्रामध्ये नवा अध्याय निर्माण करेल. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश नेते नवनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. सौराष्ट्र बँकेच्या उद्घाटन प्रसंगी बँकेचे संचालक प्रा. सिद्धेश्वर पटणे मार्गदर्शक चेतन वैजापूरे यांना शुभेच्छा दिल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नवनाथ गायकवाड यांनी स्पष्ट केले की, युवकांनी युवकांना रोजगार मिळावा. या उदात्त हेतूने सुरू केलेली ही बँक म्हणजे उद्योगधंदे उभारणीसाठी युवकांना मदतीचा हात देणारी सहकार क्षेत्रातील नवी संधी आहे. सुशिक्षित बेकार, बेरोजगार यांच्या हाताला काम देण्यासाठी तसेच उद्योगधंदे उभा करून इतरांच्या ही हाताला काम देता येईल, अशी क्षमता युवकांमध्ये निर्माण करावी. आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, अशा उदात्त हेतूने सहकार क्षेत्रात उतरलेल्या या सर्व तरुण मित्रांना आपल्या वतीने व मित्र मंडळाच्या वतीने शुभेच्छा आहेत. या बँकेसाठी जेव्हा केव्हा गरज पडेल, तेव्हा आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी पुढे येऊ असे आश्वासनही याप्रसंगी नवनाथ गायकवाड यांनी दिले.
सौराष्ट्र बँकेसोबतच युवकांसाठी जे जे म्हणून प्रयत्न करू इच्छित असतील त्या सर्वांना आपल्या वतीने शुभेच्छाच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सौराष्ट्र बँकेच्या पाठीशी अनेक मोठी मंडळी आणि बँक क्षेत्रातील जाणकार असल्याने ही बँक निश्चितपणे प्रगतीचे नवे आयाम लवकरात लवकर गाठतील, असा विश्वासही नवनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
