वृक्ष दान – दत्तक अभियान अंतर्गत स्वयंसेवकांचे श्रमदान

वृक्ष दान - दत्तक अभियान अंतर्गत स्वयंसेवकांचे श्रमदान

उदगीर (प्रतिनिधी) : येथील शिवजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वृक्ष दान-दत्तक अभियानाच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कार्य सुरु करण्यात आले आहे. पर्यावरणाचे संवर्धन व श्रमसंस्कार तसेच पर्यावरनविषयक जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी हे कार्य हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत उदगीर येथील विद्यानिकेतन कॉलनीमध्ये वृक्षारोपणासाठी श्रमदान करण्यात आले. कॉलेज चे सर्व तास संपल्यानंतर रासेयोच्या स्वयंसेवकांनी वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याचे कार्य केले. या कामासाठी मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉ. सुरेश शिंदे, वृक्ष दान-दत्तक अभियानाचे संयोजक प्रा. बालाजी सूर्यवंशी यांच्यासोबत रामचंद्र, गणेश, अविनाश, विट्ठल, ऋतिक, आदित्य, अमित, पृथ्वीराज इत्यादि स्वयंसेवकांनी कार्य केले. उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. जगताप व डॉ. आर. एम. मांजरे यांचे सहकार्य लाभले.
महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदधिकारयांच्या प्रेरणेने वृक्षसंवर्धनाचे हे कार्य करण्यात येत आहे.सर्वांन्नी राष्ट्रीय सेवा योजनेच्या या कार्याचे कौतुक केले तसेच वृक्षदान करुन सहकार्य व प्रोत्साहन दिले.

About The Author

error: Content is protected !!