तालुकास्तरीय लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील पंचायत समिती सभाग्रहात दि २४ ऑगष्ट रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत तालुक्यातील तालुकास्तरीय लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या नुतन पदाधिकारी तसेच कार्यकारणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील तालुकास्तरीय लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेची बैठक दि २४ ऑगष्ट रोजी पंचायत समिती सभाग्रह येथे शैलेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व राजकुमार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येऊन नुतन पदाधिकारी तसेच कार्यकारणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असुन सदरील बैठकीत खालील प्रमाणे संघटनेच्या नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
यशवंत देशमुख अध्यक्ष, राजकुमार तिर्थकर उपाध्यक्ष,शिवाजी आबंदे सचिव,आंकुलवाड एस.सी. कार्याध्यक्ष,मनिषा मिरजकर महिला सदस्या, होंदरने संध्या सदस्या, प्रविण भोसले सदस्य, संभाजी डोखळे सदस्य तथा प्रसिद्धी प्रमुख, उजळंबकर एल.बी. सदस्य याप्रमाणे तालुकास्तरीय लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेची समिती तयार करण्यात आलेली असुन सदर समितीवर, जिल्हास्तरीय समिती सदस्य शैलेष जोशी सहाय्यक प्रशासन अधिकारी व सोनकांबळे आर.डी.कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांची मार्गदर्शक म्हणुन निवड करण्यात आली आहे. सदरील सर्व नवनिर्वाचित संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकारणी यांचे हनमंतराव मुरुडकर, रमाकांत पट्टेवाड, सतिश केंद्रे, सिध्देश्वर नल्ले, धनाजी सुळे,शिवाजी शिरडे, गोपाळ गुट्टेवाडीकर, श्याम मुस्के, सचिन तावरे राजेंद्र कांबळे, तानाजी साने, आदींनी अभिनंदन करून नविन कार्यकारणीस पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
