राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे युवक नेते प्रशांत भोसले यांच्या वतीने श्रावणमासा निमित्त बेल पत्राचे घरोघरी वाटप
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवक लातुर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले यांच्या वतीने श्रावणमासाचे निमित्त साधुन शहरातील वार्ड क्रमांक ११ मधील महिलांना श्रावण महिण्यात आलेल्या चार सोमवारी घरोघरी जाऊन १०८ बेल पत्राचे एक पॉकेट तयार करुन असे जवळपास तीन हजार पॉकेटचे वाटप करण्यात आले
याविषयी सविस्तर माहिती अशी की, हिंदु संस्कृतीमध्ये श्रावणमासात बेल पत्राचे खुप महत्व असुन या महीन्यात महिला मोठ्या प्रमाणात दर सोमवारी भगवान शिव यांच्या डोक्यावर बेल पत्र ठेवत असतात पुराणात अशी कथा आहे की, समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते. तेव्हा त्यांच्या घश्यात जळजळ होऊ लागली. बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली. दुसर्या आख्यायिकेनुसार, बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत. म्हणजेच शिवचेच स्वरुप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते. त्यामुळे अशा या श्रावणमास महीण्याचे निमित्त साधुन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव तसेच अहमदपूर -चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले यांनी शहरातील वार्ड क्रमांक ११ मधील महीलांना घरोघरी जाऊन १०८ बेल पत्राचे एक पॉकेट तयार करून श्रावण महिण्यात आलेल्या चार सोमवारी जवळपास तीन हजार पॉकेटचे वाटप करण्यात आले.
