कायद्याची माहिती नाही म्हणून गुन्हा करण्यास मुभा नाही – जिल्हा सत्र न्यायाधीश डी पी सातवेळकर

कायद्याची माहिती नाही म्हणून गुन्हा करण्यास मुभा नाही - जिल्हा सत्र न्यायाधीश डी पी सातवेळकर

उदगीर (एल.पी. उगिले) : कायद्याचे अज्ञानच कायद्याला मान्य नसल्याने कायदा लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी शिबिरांची आवश्यकता असल्याचे मत जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. सातवेळकर यांनी व्यक्त केले.
ते मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालयात आयोजित तालुका विधी सेवा समिती आयोजित विधी साक्षरता शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश आर. बी. गिरी , अॅड. महेश मळगे उपस्थिती होते . पुढे बोलताना न्यायाधीश सातवेळकर म्हणाले की, कायदा प्रत्येकापर्यंत पोहोचण्याची गरज असून महाविद्यालयातून रॅगिंग सारखे प्रकार घडू नयेत, यासाठी शिबिराची आवश्यकता आहे.

वाईट वाटेल असे बोलणे, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष विद्यार्थ्याला वर्तनातून त्रास देणे. यात दोशी असणाऱ्याला शिक्षा होऊ शकते. दिवाणी न्यायाधीश आर. बी. गिरी यांनी लैंगिक अत्याचार याविषयी बोलताना म्हणाले की, देशातील १८ वर्षाखालील बालकांची संख्या ४७ कोटी असून त्यातील २४% बालकावर घरातील व नातेवाईकाकडूनच अत्याचार होतात . लहान मुलावरील लैंगिक अत्याचारामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. त्या बालकांना गुन्हा विषयी माहिती सांगता आली नाही तर त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होऊन, त्यांच्या प्रगतीमध्ये बाधा येत असते , बारा वर्षाखालील मुलावर जर लैंगिक अत्याचार झाला तर आरोपीला फाशीची शिक्षा व १८ वर्षा खालील मुलावर लैंगिक अत्याचार झाला तर जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते असे त्यांनी सांगितले .
यावेळी सी-डॅक कॉम्प्युटर मधील MS-CIT मध्ये १०० पैकी १०० गुण घेउन प्रथम येणारे कासार दरेश्वरलाल , कारवा मधुसूदन , कोळखेडकर विकास , गव्हाणे उमादेवी , भोसले शुभांगी , धनशेट्टे आकांक्षा , तसेच १०० पैकी ९९ गुण घेउन द्वितीय येणारे शेख सानिया , तानशेट्टी गणेश , मार्ग पवार , मुळखेडे वेदांत तसेच १०० पैकी ९८ गुण घेउन तृतीय येणारे पाटील संध्या , पाटील ऋषिकेश , बिरादार अनिकेत , सूर्यवंशी दिव्या , पाटील विजय , पाटील राजनंदिनी , लदाडे कोमल , गव्हाणे शुभांगी , चापुले श्रद्धा , चापुले श्रुती , सूर्यवंशी स्वप्नील यांचा सत्कार करण्यात आला .
मातृभूमी नर्सिंग स्कूल व कस्तुराबाई नर्सिंग स्कूल च्या विविध स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय पारितोषक प्राप्त विद्यार्थी वाळिंबे पल्लवी , गवळी सुप्रिया , जाधव ममता , काटेकर रोहिणी , गवाले वैष्णवी , वाघमारे अश्विनी , कोदरे कोमल , गायकवाड पूर्वा , काटेकर रोहिणी , शिंदे रमा , सोनकांबळे पूजा , साळुंखे प्रतीक्षा , शिंदे ओमकार, मुंडे अनिकेत, सूर्यवंशी अश्विनी , कांबळे पायल , बनसोडे प्रतीक्षा , तपासे निखिल , भोसले रितेश यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

अॅड. महेश मळगे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक , प्राध्यापक बिभीषण मद्देवाड यांनी सूत्रसंचालन प्रा.रेखा रनक्षत्रे यांनी आभार मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी प्रा. सय्यद उस्ताद , प्रा. रणजीत मोरे , प्रा. धोंडीराम जोशी , प्रा. रूपाली कुलकर्णी , ग्रंथपाल उषा सताळकर , जगदीशा ओंकारे , दयानंद टाके , विवेक देवर्षे आदींनी प्रयत्न केले .

About The Author

error: Content is protected !!