अतनूर तंटामुक्ती अध्यक्षपदी विकास सोमुसे-पाटील

अतनूर तंटामुक्ती अध्यक्षपदी विकास सोमुसे-पाटील

अतनूर (प्रतिनिधी) : येथील तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी विकास गोविंदराव सोमुसे-पाटील तर उपाध्यक्षपदी अरविंद माधवराव सासट्टे यांची ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली. सरपंच चंद्रशेखर अशोकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. सदस्यपदी आयुब सरवरसाब शेख, दिलीप कुशोबा कोकणे, मुक्तेश्वर गोविंदराव येवरे-पाटील, सुधाकर मारोती कापडे, गोविंद गोपाळराव कोकणे, इस्माईल ईनायत मुंजेवार, गणेश आनंद गायकवाड, शफियोद्दीन रज्जाकसाब मुंजेवार, संग्राम झोटींग घुमाडे, पत्रकार प्रतिनिधी बालासाहेब गोविंदराव शिंदे, निमंत्रक पोलीस पाटील प्रकाश व्यंकटराव गव्हाणे-पाटील, तलाठी प्रतिनिधी अतिक शेख, ए.एच.शेख, ग्रामसेवक प्रतिनिधी फिरोज शेख, एफ.एल.शेख, बीट अंमलदार प्रतिनिधी यांची यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!