बालकाला आपटून जिवे मारन्याचा प्रयत्न करणाऱ्या वाढवणा येथील संग्राम नारायणकर यास 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

बालकाला आपटून जिवे मारन्याचा प्रयत्न करणाऱ्या वाढवणा येथील संग्राम नारायणकर यास 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

वाढवणा बु : वाढवना बु येथील रहिवाशी असलेला संग्राम पांडू नारायणकर या आरोपीने गावातीलच फिर्यादी अब्दुल रहीम अहमदसाब कासार यांचा नातू यास 26-7-2019 बुधवार रोजी घरातुन टोमॅटो आणण्यासाठी शास्त्री चौक इक्रा मोदीन इस्माइल कासार यांच्या दुकाना समोर सायंकाळी 5-30 वाजता, लहान बालकाला पायात पाय घालुन वर उचलुन डोक्यावर पाडून, मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून फिर्यादी बालकाचा अज्जा अब्दुल रहीम कासार यांनी वाढवणा ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरुन 26-7-2019रोजी आरोपी संग्राम पंडू नारायणकर रा. वाढवणा बु याच्या विरुद्ध गु. र. न.100/19 कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास सपोनि गफ्फार शेख यांनी करून दोषारोप उदगीर न्यायालयात दाखल केले. उदगीर न्यायालय क्रमांक 1न्यायाधीश डी. पी.सतवळेकर यांनी सरकारी वकील जी. सी. सय्यद यांनी युक्तिवाद केला व तोंडी व लेखी पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीश सातवेळकर यांनी अरोपी संग्राम पंडू नारायंनकर यास 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली, असून 5000 रू दंडाचीही शिक्षा दिली आहे, दंड नाही भरल्यास तिन महिने शिक्षा भोगावी. असा निकाल न्यायाधीशांनी दिला आहे.या निकालाकडे लोकांचे लक्ष लागून होते.

About The Author

error: Content is protected !!