संजय गांधी निराधार समितीवर गोविंद सूर्यवंशी यांची निवड

संजय गांधी निराधार समितीवर गोविंद सूर्यवंशी यांची निवड

निलंगा (भगवान जाधव) : तालुक्यातील हादगा गावचे सुपुत्र व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष गोविंद सूर्यवंशी यांची जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीवर उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्या वर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निवडीबद्दल गोविंद सूर्यवंशी यांचा हादगा गावात व परिसरात सत्कार करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शिफारशी नुसार या समितीत अध्यक्ष म्हणून देवदत्त पाटील तर उपाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी तसेच श्रीमती राजमाता दानाई, विनोद आर्य, गोविंद शिंगाडे, नागनाथ पाटील, समद लाल टेकडे, सुरेंद्र धुमाळ, दिलीप पाटील, व्यंकटराव पाटील सह गटविकास अधिकारी व तहसीलदार यांचा समावेश करण्यात आला आहे.

About The Author