औशात मटका चालविणाराला आशिर्वाद कोणाचा ?

औशात मटका चालविणाराला आशिर्वाद कोणाचा ?

शहरातील मटका बंद करण्यांची मागणीऔसा (प्रतिनिधी) : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी चे प्रमाण वाढत आहे. गल्लोगल्ली बोळा मध्ये मटका जुगार धंदे खुलेआम चालू आहेत. हे धंदे बंद करण्यासाठी औसा येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस अधीक्षक लातूर यांना निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात औसा येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेऊन मटका, जुगार अवैध धंदे बंद करण्याबद्दल पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते सोनाली गुलबिले, शेख अहेमद (पप्पू), इलियास चौधरी आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पुढे बोलताना सामाजिक कार्यकर्ते सोनाली गुलबिले म्हणाल्या की, औसा शहरात दोन प्रमुख मटका किंग आहेत गल्ल्या गल्लीत एजंट मटक्याचे आकडे राजरोसपणे घेत असतात औसा शहर आणि तालुक्यात वीस पेक्षा अधिक बुकी चालतात या बुकी आ पहिल्यासारख्या चिट्ट्यावर चालत नाहीत सांकेतिक भाषेत आणि व्हॅटसअॅप वर चालतात थोडी थोडी नव्हे तर मोठमोठ्या उलाढाल दररोज औशात होतो औसा शहरात सरकारी दवाखान्याच्या दोन्ही बाजूस मौलाना अबुल कलाम आझाद चौक, औसा पंचायत समिती समोर, भारतीय स्टेट बँकेच्या बाजूला, कालन गल्ली समोरील बाजूस, हनुमान मंदिर परिसरात, बस स्टॅन्ड जवळ, आजाद चौक, निलंगा वेस, किल्ला मैदान, खंदक गल्लीनगर परिषदेची जागा वरील ठिकाणी असे अवैध धंदे चालू असल्यामुळे औसा सारख्या ऐतिहासिक संतांची भूमीला कुठेतरी गालबोट लागत आहे या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या परगावी लोक हे सदरील अवैध धंद्याबाबत चर्चा करीत आहेत व अल्पवयीन नवीन पिढी याकडे आकर्षित होत आहे तरी मेहेरबान साहेबांनी मटका या जुगाराची चालू असलेली दुकाने त्वरित बंद करावी ही दुकाने चालवीत असलेल्या लोकांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी माहिती पोलीस अधीक्षक लातूर यांना निवेदनाद्वारे देण्यात आली.

About The Author

error: Content is protected !!