उदगीर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नवटक्के, सचिवपदी ॲड. हुडगे

उदगीर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नवटक्के, सचिवपदी ॲड. हुडगे

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील वकील संघाची निवडणुक संपन्न झाल्या.
या निवडणुकात विधिज्ञ बाळासाहेब नवटक्के यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला .
या पॅनल मधून सचिवपदी अॅड सचिन संग्राम हुडगे हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत, प्रत्यक्ष झालेल्या निवडनुकीमध्ये उपाध्यक्ष म्हणून अॅड विष्णू लांडगे, सहसचिव पदी अॅड अखिल हाश्मी ,कोषाध्यक्ष अॅड ज्ञानोबा सोमवाड, ग्रंथालय सचिव अॅड नामदेव पांचाळ, महिला प्रतिनिधी अॅड पूजा कपिकेरे हे बहुमताने विजयी झाले.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड . महेश माशाळकर यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अॅड . झेड. के. जहागीरदार व अॅड. चंद्रशेखर भोसले यांनी काम पाहिले.
या विजयी उमेदवारांचे विधिज्ञ वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. बालाजी पाटील टाकळीकर, सचिव ॲड.भास्कर बोळे, ज्येष्ठ विधीज्ञ गुलाबराव पटवारी, ॲड. व्ही एन औरादे, विधीज्ञ तोबरे, ज्येष्ठविधीज्ञ एस. टी. पाटील त्यांच्यासह मित्र मंडळाने व सर्व विधीज्ञानी कौतुक व अभिनंदन केले आहे.

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नुतन पदाधिकार्‍ यांचा विधिज्ञ मंडळीनी सत्कार केला.या प्रसंगी जेष्ठ विधिज्ञअॅड एस.टी.पाटिल,अॅड व्हि.एन.औरादे यांनी शुभेच्छा देऊन नुतन कार्यकारणीने जिल्ह्यामध्ये उदगीर वकिल सघांचा वेगळा ठसा आपल्या कार्यातून निर्माण करावा .असे सांगून कार्यास शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!