१० लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल!

१० लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल!

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील सरस्वती कॉलनीमधील एका विवाहितेला माहेरहून १० लाख रुपये घेऊन म्हणून शिवीगाळ व मारहाण करुन,उपासपोटी ठेऊन, शारीरिक व मानसीक छळ केल्याबद्दल अहमदपूर पोलीसात विवाहितीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन आज दि.२६ ऑगस्ट रोजी अहमदपूर पोलीसात पतीसह ०६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलीस सुत्राकडून समजलेली माहिती अशी की, शुभांगी संतोष पाटील वय ३२ रा. सरस्वती कॉलनी अहमदपूर या विवाहितीने पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती संतोष माधव पाटील, सासु कमलबाई पाटील,सासरे माधव तुकाराम पाटील,व नंदा आदींनी मला माहेरहून १० लाख रु. घेऊन ये म्हणून शिवीगाळ,मारहाण करुन,उपासपोटी ठेऊन, माझा शारिरीक व मानसीक छळ केला.व जीवे मारण्याची धमकी दिली.या फिर्यादीवरुन अहमदपूर पोलीसांनी पतीसह सहा जणांवर कलम ४९८ अ,५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.आरदवाड हे करत आहेत.

About The Author

error: Content is protected !!