शिरूर ताजबंद ता. अहमदपूर येथे बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा!
अहमदपूर (गोविंद काळे) : मौजे शिरूर ताजबंद येथे मोठ्या उत्साहात शेतकरी बांधवांनी बैलपोळा सण साजरा केला. यावेळी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढत बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्रसंगी उपस्थित राहून शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या आमदार तथा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच साहेबरावजी जाधव , सुभाषरावजी पाटील, जि.प गटनेते मंचकराव पाटील, सुरजभैय्या पाटील, युवराज भैय्या पाटील, प्रा. द.मा. माने सर, महेश बिल्लापटे, चेअरमन तुळशीरामजी भोसले, बालाजी दमकोंडवार, बालाजी गुंडरे, कोंडीबा पडोळे, बबन बिल्लापटे, राजू चव्हाण, शिवाप्पा स्वामी, विजय येलंमटे, गोविंद कापसे, रामराव डोंगरे, हरी बिल्लापटे व ग्रामस्थ उपस्थित होते.
