हुतात्मा स्तंभावरील एक स्तंभ गायब व स्वातंत्र्यसैनिकांची नावे मागच्या बाजूला लावून अवमान केल्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

हुतात्मा स्तंभावरील एक स्तंभ गायब व स्वातंत्र्यसैनिकांची नावे मागच्या बाजूला लावून अवमान केल्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर शहरात भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्याच्या व कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ नगर परिषदेच्या जुन्या इमारतीसमोर गेल्या अनेक वर्षापासुन दोन हुतात्मा स्मारक अस्तित्वात होते. याची दुरावस्था झाल्याने नवीन बांधकामात हुतात्मा स्तंभावरील स्वातंत्र्यसैनिकांची नावे जाणीवपूर्वक मागच्या बाजूला लावून व तसेच एकच स्तंभ केल्याबद्दल हुतात्मा स्मारक गौरव समीतीच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगर परिषद अहमदपूर यांना हुतात्मा स्मारक समीतीच्या वतीने निवेदन दिले आहे.

सदरील हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती नगर परिषदेमार्फत गेल्या काही महिन्यापूर्वी झाल्याचे समजते. या हुतात्मा स्मारकावर पूर्वी दोन स्तंभ होते. त्या दोन्ही स्तंभावर स्वातंत्र्यसैनिकांची नावे ठळक पद्धतीने पुढच्या बाजूला कोरलेली होती. मात्र नवीन बांधकांमामध्ये यामधील एक हुतात्मा स्तंभच गायब करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे फक्त आठ नावे पुढच्या स्तंभावर कोरलेली असुन इतर उर्वरीत ४५ नावे हि मागील बाजूला कोरून हुतात्मा स्तंभावर बाकीचे नावे दर्शनी स्वरूपात दिसत नसल्यामुळे या स्वातंत्र्यसैनिकांचा या कृतीमुळे अवमान होत आहे.

नगर परिषदेच्या वतीने पूर्वीप्रमाणे दोन स्तंभ तातडीने बांधुन या दोन्ही स्तंभावर समोरील बाजूस ठळक पध्दतीने या स्वातंत्र्यसैनिकांचे नावे लिहावेत व होणारा अपमान तातडीने थांबवावा अन्यथा सदरील प्रकरणाच्या विरोधात तीवृ स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यास नगर परिषद कार्यालय व वैयक्तिक जबाबदार असाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले असुन या निवेदणावर हुतात्मा स्मारक गौरव समीतीचे पदाधिकारी प्रा. दत्ताभाऊ गलाले, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंद शेळके, युवक नेते डॉ. सिध्दार्थकुमार सुर्यवंशी, पांडुरंग गलाले, अॅड. आनंद जाधव, शिवाजी गलाले, बालाजी गलाले, दिपक पाटील, राजकुमार पाटील, दिगांबर गलाले, सचिन बानाटे यांच्यासह हुतात्मा स्मारक गौरव समीतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

About The Author

error: Content is protected !!